खामगावात राजकीय वातावरण चिघळले, अवैधधद्यांचा परिपाक

0

खामगाव(प्रतिनिधी) – कोव्हिड-19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जाहिर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता कोरोना रोगाचा फैलाव होवु शकतो असे कृत्य करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक राकेश राठोड विरुध्द शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, शनिवार दि.24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास नायब पोलीस कॉन्स्टेबल सचिन वसंतराव बावने हे फरशी भागातुन पेट्रोलिंग करीत असतांना भाजी मंडी जवळ सार्वजनिक रोडवर भाजपा नगरसेवक राकेश राठोड, रा.दाळफैल याने तोंडाला मास्क न लावता रस्त्याने जाणार्‍या एका इसमास जोर-जोराने बोलुन त्यास अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार नायब पोलीस कॉन्स्टेबल सचिन बावने यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मोटर सायकल थांबवुन राकेश राठोड यास  काय झाले असे विचारले असता त्यांनी गैरवर्तन केले.

यावेळी त्याचा एक अज्ञात साथीदार मोबाईलमध्ये सदर घटनेचे चित्रीकरण करीत होता. यावेळी राकेश राठोड याने तोंडाला मास्क न लावता कोरोना रोगाचा फैलाव होवु शकतो हे माहित असतांना सुध्दा जिल्हाधिकारी यांच्या कोव्हिड-19 च्या आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केली. यावरुन पोलीस नायब पोलीस कॉन्स्टेबल वसंतराव बावने यांच्या फिर्यादीवरुन भाजपा नगरसेवक राकेश राठोड रा.दाळफैल व एका अज्ञात इसमाविरुध्द कलम 188,269,270,294 भादंवि प्रमाणे शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर घटनेचे मोबाईलमधून चित्रण करून व्हायरल करणारा व्यक्ति विक्की नामक असल्याचे कळाले आहे. सामाजिक शांतता भंग करणार्‍या या व्यक्तिचा शोध घेऊन त्याचेविरूध्द आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत. तर दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी रात्री आकाश शेळके याने शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न करून पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आकाश शेळके विरूद्ध भादंवि कलम 309, 188, 279, 270 व अपातकालीन व्यवस्था अधिनियम 51 ब अश्या विविध कलमानुसार शहर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे आकाश शेळके हा काही दिवसांपूर्वी शेगांव रोडवरील बोबडे यांच्या शिवराज फॉर्म हाऊस मध्ये आयपीएल क्रिकेट सट्टा खेळताना सहकार्‍यासोबत पकडला गेला होता.

सध्या खामगाव शहरातील राजरोसपणे चालणारे अवैध धंदे बंद झाल्यामुळे अवैधधंदेवाईकांचे पित्त खवळल्याने असे निंदनीय प्रकार घडत आहेत, म्हणजेच हा अवैधधंद्यांचा परिपाक असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.