भारताला मदत करण्यासंदर्भात जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले की…

0

नवी दिल्ली | भारतात कोरोना प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना लस बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने ऐनवेळी नकार दिला होता. परंतु आता सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर अखेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन याना नमतं घ्यावं लागलं. अखेर अमेरिकेकडून भारताला सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन देण्यात आले असून लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली आहे.

भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी ट्विट केलं असून, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.