जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; आज ७७२ नवे रुग्ण आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. संसर्ग अधिक वेगाने पसरत असून आज शुक्रवारी जिल्ह्यात नव्या रुग्णांचा आकडा ७०० च्या वर गेला. त्यात एकट्या जळगाव शहरातील साडेतीनशे रुग्णांचा समावेश आहे.

 

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात ७७२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज दिवसभरात २४६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्ह्यातील पाच रूग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे आजवरच्या कोरोना बळींची संख्या १४०१ इतकी झालेली आहे.

 

दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये सर्वाधीत कोरोना बाधीत रूग्ण जळगाव शहरात ३५९ इतके आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-१०७; भुसावळ-६४; तर चाळीसगाव ५१ इतके पेशंट आढळून आले आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता; जळगाव तालुका-२३; एरंडोल-४८; अमळनेर-१९; बोदवड-६, पाचोरा, व भडगाव प्रत्येकी-२; धरणगाव-२४; यावल-१७; जामनेर-१३; रावेर-३ पारोळा-१५; व मुक्ताईनगर -१८ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.