संजय राठोड राजीनामा अधिकृत झाल्याने जळगाव भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष…

0

जळगाव (रजनीकांत):-पूजा चव्हाण ह्या २१ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे आरोपी हत्या प्रकरणी संशयित वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला राजीनाम्याचे पत्र भारतीय जनता पार्टी चा दबावाने अखेर काल दिनांक ४ मार्च रोजी राज्यपाल मा. श्री भगतसिंग केशरीजी यांना प्राप्त झाला. आणि मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आणि संजय राठोड यांना मंत्रीपदावरून काढण्यात आले म्हणून भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे आज आज दि ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता वसंत स्मृती जिल्हा कार्यालय येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे अध्यक्ष श्री दीपक भाऊ सूर्यवंशी, म.न‌.पा च्या महापौर सौ भारती ताई सोनवणे, महानगर सरचिटणीस श्री महेश जोशी, उपाध्यक्ष श्री चंदन महाजन, श्री प्रदीप रोटे, श्री राजेंद्र मराठे, सौ शरीफा ताई तडवी, चिटणीस श्री महेश चौधरी, श्री भगतसिंग निकम (सर) जिल्हा महानगर सोशल मीडिया चे श्री अक्षय चौधरी, कार्यालयीन मंत्री श्री प्रकाश पंडित, ज्येष्ठ नगरसेवक श्री कैलाश आप्पा सोनवणे, श्री दत्तु कोळी, नगरसेविका सौ पार्वता ताई भिल, मंडल क्र.६ चे अध्यक्ष श्री अजित राणे, जिल्हा महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री आनंद सपकाळे, ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष श्री जयेश भावसार, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री प्रमोद वाणी, श्री अतुल बारी, श्री दीपक पाटील, श्री अमित शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी , युवा मोर्चा चिटणीस सागर जाधव, जयंत चव्हाण, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख भुषण जाधव, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष रत्नेश निकम कार्यालयीन कर्मचारी गौरव सणस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.