पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग!

0

पुणे | वृत्तसंस्था
 देशाला कोरोना लस देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे नाव जगभरात झाले आहे. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटमधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. कोरोना व्हायरस वर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये  नवीन इमारतीला  भीषण आग लागली आहे. हडपसरजवळ गोपाळपट्टीमध्ये असणाऱ्या सीरम प्लांटला आग लागली आहे. याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान याठिकाणच्या संशोधकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे.अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

आग नेमकी का लागली याची चौकशी करून माहिती द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लशीचा प्लांट असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली, अशीही माहिती मिळते आहे. मात्र करोनाची लस याठिकाणी तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. देशात या लसीच्या आपत्कालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोव्हिशील्ड लसीचे डोस ११ जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीचे काही डोस देशातील प्रमुख १३ शहरांमध्ये रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.