पारोळ्यात पाच पाऊल ओढला रथ घरगुती वातावरणात रथोत्सव संपन्न

0

३८०वर्षाची परंपरा कायम

पारोळा-प्रतिनिधी
येथील बालाजी संस्थांना तर्फे ३८० वर्षाची परंपरा अखंडित ठेवत पाच पाऊल रथ ओडून मोजक्याच विश्वस्थांच्या उपस्थितीत घरगुती वातवरणात यंदाच्या कोरोनाचे सावट असलेला रथोत्सव शांततेत पार पडला.
सकाळी १०.४८ मिनीटांनी रथ हलविण्याचा मुहूर्त होता. त्या आधी ९ वाजता मानाची वंशाजाची पूजा मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी सपत्नीक केली. पूजा आटोपल्यावर श्री बालाजी महाराज रथावर विराजमान झाले. त्यानंतर लक्ष्मी रमना गोविंद बालाजी महाराज की जय या नाम घोषात रथ जागेवरून हलला.

रथाची अशी होती सजावट

आकर्षक अश्या झेंडू व शेवंतीच्या फुलांनी रथाची सजावट करण्यात आली होती. रथावर अर्जुन सारथी ,दोन राक्षस ,केळी चे घड रथावर सुवर्ण कळस ऊसाचे कमानी सर्वांचे आकर्षणाचा विषय ठरला. राम मंदिर व जुलूमपूरा येथील दोन्ही आरती परंपरा नुसार जागेवर करण्यात आल्या.

जॅक वर १२ टनचा रथाची दिशा फिरविली

सुमारे १२ टन वजन असलेला रथ हा पाच पाऊल पुढे गेल्यावर जॅकच्या सहाय्याने जागेवर फिरविण्यात आला. व पुन्हा मंदिराच्या परिसरात श्री चा रथ आल्यावर आरती करून श्री रथावरून खाली येऊन मंदिराच्या गर्भगृहात गेले. रथ जॅकवर फिरविण्यात आल्याचे बघून सर्वांचे डोळ्यांचे पारणे फिटले. जागेवर रथ जॅकवर फिरल्याचे क्लिप सॊसियल मिडीयाला व्हायरल झाली.
यावेळी संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी ,विश्वस्त ए. टी. पाटील ,कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले , विश्वस्त डॉ अनिल गुजराथी , प्रकाश शिंपी ,अरुण वाणी ,संजय कासार ,केशव क्षत्रिय ,दिनेश गुजराथी ,अभय शिंपी ,डॉ नंदकिशोर सौदानी ,रमेश भागवत ,पी. जी. पाटील ,सुरेंद्र बोहरा ,गोपाल अग्रवाल ,चंद्रकांत शिरोळे ,सुनील शिंपी ,संदीप धमके ,बापू शिंपी ,छोटू दानेज ,आदी मान्यवर उपस्थित होते.

यांनी लावल्यात रथाला मोगऱ्या

रथ पाच पाऊल ओढण्यात आला. तेव्हा रथाला मोगऱ्या वसंत बारी , कृष्णा बारी ,बापू बारी ,राजू बारी ,दयाराम पाटील ,प्रकाश बारी ,संजय बारी ,सोनू भोई ,पांडुरंग बारी ,यांच्या सह बालाजी स्वयंमसेवक आदींनी परिश्रम घेतले.

मंदिराच्या चौफेर होत्या बॅरिकेट्स

कोरोनाच्या संकटाच्या सावटात यंदा चा रथोत्सव परंपरा टिकविण्यासाठी फक्त पाच पाऊल ओडून पुन्हा जागेवर रथ लावण्यात आल्या. यावेळी गर्दी होऊ नये म्हणून मंदिराच्या चौफेर बॅरिकेटस लावण्यात आल्या होत्या. मोठा पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला होता. रथ व मंदिर परिसरात गर्दी न होती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा रथोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक चोपडा विभाग सौरभ अग्रवाल यांनी भेट देत पारोळा पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे ,अमळनेर पी. एस. आय. लबडे ,भडगाव पी. एस. आय. सुशील सोनवणे ,पाचोरा पी. एस. आय. विजया वसावे ,पारोळा पी. एस. आय. रविंद्र बागुल ,निलेश गायकवाड यांच्या सह पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.
छाया—पारोळा येथील रथ जागेवर पाच पाऊल ओढण्यात आला त्यावेळी उपस्थित संस्थानाचे श्रीकांत शिंपी ,ए. टी. पाटील रावसाहेब भोसले ,अभय शिंपी ,डॉ अनिल गुजराथी ,दिनेश गुजराथी ,संजय कासार ,प्रकाश शिंपी ,अरुण वाणी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.