धक्कादायक ! खामगाव कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

0

खामगाव: दोन दिवसांपूर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकार १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता उघडकीस आला. बद्रीनाथ जगन्नाथ वाघोडे (वय ५२) असे या आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव असून या घटनेने बाबत शहरात खळबळ उडाली आहे.

खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील बद्रीनाथ जगन्नाथ वाघोडे (वय ५२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने भरती करण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी त्यांच्या मेंदूची नस चोकअप झाल्याने त्यांच्यावर वर्धा येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बद्रीनाथ वाघोडे यांच्यावर विदर्भ ग्रामिण कोकण बँकेचे कर्ज असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.