मोदी सरकारमधील ‘ही’ महिला देणार केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

0

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील एक महिला मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसएडी सदस्य आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमधून राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

शिरोमणि अकाली दल नेता सुखबीर सिंह बादल यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, पार्टी नेता आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल संसदेत आणलेल्या कृषी संबंधित विधेयकाच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारमधून राजीनामा देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. त्यातच मोदींना मोठा धक्का बसला आहे.

कृषी व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 वर चर्चेत सहभागी होत सुखबीर बादल म्हणाले की, शिरोमणि अकाली दल शेतकऱ्यांची पार्टी आहे. आणि ती कृषी संबंधित या विधेयकाचा विरोध करते. आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांचं म्हणणं पोहोचवलं आहे. आम्ही या विषय अनेक व्यासपीठावर उपस्थित केला. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न दूर व्हावेत यासाठी पूर्ण प्रयत्न केला, मात्र असे होऊ शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.