Moto Razr फोन तब्बल ३० हजार रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या

0

नवी दिल्लीः गेल्यावर्षी लाँच केलेल्या मोटोरोलाचा फोल्डेबल फोन Moto Razr तब्बल ३० हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. याबाबतची माहिती महेश टेलिकॉमने आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. ट्विटच्या माहितीनुसार, मोटो रेजर २०१९ फोन आता ९४ हजार ९९ रुपयांना झाला आहे. आधी या फोनची किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपये होती.

मोटो रेजर २०१९ चे खास वैशिष्ट्ये

फोनमध्ये 21:9 चे आस्पेक्ट रेशियो सोबत ६.२ इंचाचा फ्लेक्सिबल ओलेड डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्ले मध्ये हिंज लावलेला आहे. याच्या मदतीने फोन फोल्ड होतो. नोटिफिकिशन्स वाचण्यासाठी फोनच्या बाहेरच्या बाजुला एक सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्ले द्वारे युजर फोन विना अनफोल्ड करून गुगल असिस्टेंटचा वापर करू शकतो. फोनमध्ये दिलेल्या दोन्ही डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शनसोबत येतो.

६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिले आहे. फोन अँड्रॉयड ९ आउट ऑफ द बॉक्स ओएसवर चालतो. फोटोग्राफिसाठी या फोनमध्ये लेजर ऑटोफोकस सोबत १६ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 2510mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

Leave A Reply

Your email address will not be published.