राज्यात 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राज्यात रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 60 हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यांच्या जागी विनीत अगरवाल प्रधान सचिव गृह ( विशेष) हे जागा सांभाळणार आहेत तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलिस आयुक्तांची बदली होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. गेल्या महिन्यात काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर डॉ. व्यंकटेशम् यांना मुदतवाढ दिल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी रात्री उशीरा गृह विभागाने राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. डॉ. व्यंकटेशम् यांची बदली अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान) या पदावर करण्यात आली आहे. याबरोबरच २२ पोलिस अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

police officer transfer

police officer transfer

police transfer

police officer transfer

police transfer

police transfer

Leave A Reply

Your email address will not be published.