मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण

0

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातचं विलग करण्यात आल आहे. खुद्द किशोरी पेडणेकर यांनीचं ट्वीट करून या संदर्भातली माहिती दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय कि, मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली आहे. ही चाचणी सकारात्मक आली आहे. मात्र कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. तसेच गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी असेही पेडणेकर यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.