नादवेल येथे अनोखा पध्दतीने केला मुलीचा वाढदिवस साजरा

0

कु-हा काकोडा (प्रतिनिधी) : उपविभागीय पोलिस आधिकारी प्रदीप मुरलीधर पाटील (खामगाव) यांनी आपली मुलगी सई हिचा वाढदिवस त्यांचे मूळ गावी नांदवेल ता मुक्ताईनगर जि जळगाव येथे गावातील १० वर्षाच्या आतील सर्व मुलींचे “सुकन्या समृद्धी योजने” खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडून देत वाढदिवस साजरा करण्यात आला.

कुमारी सई हिच्या हस्ते गावातील पालकांना व मुलांना खाते पासबुक वाटप करण्यात आले. वाढदिवसाला जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील शाळीग्राम पाटील, मुरलीधर पाटील, भागवत पाटील,तुकाराम खिरोडकर, सौ कविता प्रदीप पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित लोक हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.