शिवरे येथे कामगाराची गळफास घेत आत्महत्या

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवरे येथील सुभाष देवचंद भिल या ४० वर्षीय ऊसतोड कामगाराने राहत्या घरी कुणी नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० सुमारास घडली.

शिवरे येथील सुभाष भिल या ऊसतोड कामगाराने आपल्या स्वमालकीच्या घरात कुणी नसल्याचे पाहून सोमवारी ता.३ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गळफास घेत जीवनयात्रा संपविली. दरम्यान गळफास घेत आत्महत्या का केली असावी.? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शिवरे गावात शोककळा पसरली आहे. सुभाष भिल यांच्या पच्यात २ मुली ३ मुले असा परिवार आहे. पोलिसात दिलीप देवचंद भिल यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पारोळा पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.