“मिशन बिगिन अगेन’ ; मुंबईतील सर्व दुकाने उद्यापासून आठवडाभर खुली

0

मुंबई – “मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत मुंबईतली सर्व दुकाने बुधवार, दि. 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारीच ही बातमी ठरली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहे. परिणामी 5 ऑगस्टपासून शहरातीस सर्व दुकाने आठवडाभर म्हणजेच सातही दिवस सुरु राहणार आहे.

याशिवाय दारूची दुकानं सुद्धा उघडण्यात येणार आहेत. सम-विषमचे सर्व नियम रद्द करण्यात आले असून, आता अनलॉकच्या प्रक्रियेचा हा नवा टप्पा शहरात सुरु होणार आहे. एवढंच नाही तर मद्य हे घरपोचही देता येणार आहे. केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे.

कोणत्याही नियमाचा भंग केला तर कारवाई केली जाणार आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्‍समधली दुकानेही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मॉलमधली थिएटर्स बंद राहणार, फूड कोर्ट, रेस्तरॉं, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.