विजेचा जोरदार धक्का लागल्याने ५६ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव (प्रतिनिधी) :– शहरातील हरीविठ्ठल नगरातील ५६ वर्षीय प्रौढाचा विद्यूतपंपाच्या विजेचा जोरदार धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. प्रकाश रामधन पवार (वय-५६) असे या मृत प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक असे की, शहरातील जुा आठवडे बाजार परिसरात प्रकाश पवार हे आपल्या कुटुंबासह राहतात. पत्नी धुणीभांडीचे काम करत असल्याने त्या कामासाठी नेहमीप्रमाणे गेलेली होती. घरी पवार तसेच त्यांची वृध्द आई हे दोघेच होते. हरिविठ्ठल नगर परिसरात सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी 11.30 वाजेच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. यामुळे पवार यांनीच पाणी भरण्यासाठी मोटार लावली. मोटार लावण्यानंतर काही वेळाने मोटारीची नळी निघाली. ती पुन्हा मोटारीला लावत असतांना पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. शेजार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या परिसरात पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी घटनास्थळ गाठले. व तत्काळ प्रकाश पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्रकाश पवार यांचं हरिविठ्ठल रिक्षा स्टॉपवर सलूनचे दुकान होते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी शालीनी, आई, सखुबाई व मुलगा शुभम व भाऊ राजेंद्र पवार असा त्यांचा परिवार आहे. शुभम हा पुण्याला वास्तव्यास आहे. तर राजेंद्र पवार यांचेही हरिविठ्ठल नगरात सलूनचे दुकान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.