पाळधी येथील सेंट्रल बँकेचे एटीएम ठरतेय ‘शो-पीस’

0

पाळधी (प्रतिनिधी)। व्यवहारासाठी नेहमी रक्कम आवश्यक असते सदर रक्कम खिशात बाळगण्यापेक्षा बँक खात्यातून ए.टी.एम.मधून आवश्यकतेनुसार काढणे कधीही सोयीचे ठरते पण लॉकडाऊनच्या दिवसात पाळधी सेंट्रल बँक शाखेला लागून असलेले ए.टी.एम.मध्ये मात्र कायम ठणठणात असल्याचे दिसून येते.

बंद पडलेले ए.टी.एम मशीन
याबाबत शाखा प्रबंधला विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्राहक निराश होत आहेत. काही वेळेस कार्यालयीन वेळेत देखील मशीन बंद असते, शाखा बंद झाली तेव्हा देखील मशीन बंद असते. दरम्यान बँकेकडून नवीन ए.टी.एम.कार्ड वितरीत करण्यात येत असतात मात्र गुप्त पिनकोड जनरेट करण्यासाठी देखील ए.टी.एम. मशीनची आवश्यकता असते. अशा पध्दतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.तसेच लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सेंट्रल बँक पाळधी शाखेत पासबुक एन्ट्री करून मिळत नसल्याने खाते धारकांची मोठी गैरसोय होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.