पारोळा शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस

0
पारोळा–प्रतीनिधी
गुरुवारी रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान पारोळा शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे शहरातील विज पुरवठा काही वेळा पुर्ता  खंडीत झाला होता, विज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने नागरिक चांगले च त्रस्त झाले होते,
तर अनेक शेतकऱ्यांनी पशुधना साठी चारा साठवुन ठेवला होता तो चारा खराब झाला असल्याचे बोलले जात आहे, तसेच भाजीपाला, मका, बाजरी, दादर, भुईमुग, व इतर पिकांचे ही नुकसान झाले आहे, तसेच पारोळा तालुक्यात मंगरूळ, लोणी, मेहुटेहु, करंजी, चोरवड, जोगलखेडे, बहादरपुर, महाळपुर, तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी ही रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती,

Leave A Reply

Your email address will not be published.