वरणगांव आयुध निर्माणी कर्मचाऱ्याचा चक्कर येवुन पडल्याने मृत्यू

0

  वरणगांव, वार्ताहर – आयुध निर्माणी वसाहत मध्ये टाईप थ्री ३ नंबर क्वार्टर ला राहणारे जितेंद्र तुळशीराम भोळे , वय ४६ यांचे चक्कर पडल्याने मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ .४५. वाजता घडली ,  

  याबाबत माहीती अशी की जितेंद्र घराजवळ उभे असतांना त्यांना चक्कर आले ते लोखंडी अँगल वर. पडले असता डोक्याला जखम झाली व रक्तस्राव झाला, त्यांना निर्माणी रूग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यु झाला आहे .   या घटनेबाबत वरणगांव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयताचे शव विच्छेदन वरणगांव ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले .मयत जिंतेद्र  भोळे फॅक्टरीत ई ई विभागात चार्जमन पदावर कार्यरत होते . त्याच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.