वरणगांवात कोरोना रुग्ण आढळला ?

0
वरणगांव : सध्या संपूर्ण जगासह भारतात कोरोना या जिवघेण्या आजाराने कहर केला आहे. त्यातच अवघ्या १२ कि.मी. अंतर असलेल्या भुसावळ मध्ये कोरोना बाधितांची वाढणारी संख्या पहाता वरणगांवातसुद्धा कोरोना रुग्ण आढळला असल्याची अफवा दिवसभर वाऱ्या सारखी पसरत होती. मात्र, कोरोना आजाराला नागरिक गंभीर घेत नसल्याचे चित्र दिसून आले.
शहरात दिवसभर एकच चर्चा या परिसरात कोरोना रुग्ण आढळला, त्या परिसरात अढळला अशा अफवा पसरविली जात असुन खरच या भागात कोरोना रुग्ण आढळला याची खातरजाम किंवा चौकशी करुन फेर फटका मारून याची शाहनीशा करण्यात धन्यता मानत नागरिक शहरात मुक्त संचार करत आहे. कोणत्याच नियमाच पालन करण्याची मानसिकता न बाळगता  कोरोना आपल्या पासुन  कित्येक मैल दुर अतंरावर असल्याच डोक्यात घेऊन नागरिक मिरवत आहे. मात्र, अगदी बारा कि.मी.च्या अंतरावर भुसावळ व त्यानंतर जवळच पाच कि.मी.अतंरावर दिपनगर येथील एकाला लागण  झाल्याची घटना असुन सुद्धा नागरिक कोरोना आजारा विषयी  गाभीर्यतेने घेत नसल्याचे चित्र आज शहरात आहे   शासनाने घातलेल्या नियमाच पालन किती दिवस करायाचे हा नागरिकासाठी अवघड प्रश्न झाला आहे                 एका डॉक्टरच्या आईला कोरोना झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहें .   यामध्ये डॉक्टराच्या आईचे स्वॉब तपासणी साठी धुळे पाठविण्यात आले असून त्याचा रिपोर्ट येण्या आधीच शहरात कोरोनाचा रुग्ण सपडल्याची  अफवा  पसरल्या गेल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. उलट शासनाने घातलेल्या सुरक्षीत अतंराच्या नियमाकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. परंतु अवघ्या पाच कि.मी. अतंरावर असलेल्या गावात कोरोनाचे संशयीत रुग्ण  सापडत आहेत. त्याच अनुषंगाने वरणगांव सारख्या ४० ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या शहरात जशी हवी तशी घरोघरी अजुनपर्यंत तपासणी झालेली नाही व गावात पुणे, मुंबई हुन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांची सुद्धा माहिती लपविली जात आहे . अशा परिस्थितित एका स्वतः एम.डीं . असलेल्या  डॉक्टरच्या आईला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा गावभर पसरली असून त्या मातेला जळगांवला हलविण्यात आले आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.