अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक येथून निघालेल्या लखनऊ एक्सप्रेसने घेतला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा

0

भुसावळ । प्रतिनिधी 

लॉकडाऊनमध्ये तब्बल ३८ दिवसांनंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकावरून नाशिक येथे अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक रोड येथून नाशिक- लखनऊ श्रमिक एक्सप्रेस  आज २ में रोजी निघाली . या गाडीस भुसावळ स्थानकावर थांबा देन्यात आला होता.

कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये तब्बल ३८ दिवसांनंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकावरून नाशिक येथे अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस धावली. भुसावळ रेल्वेस्थानकावर दुपारी १.३० वाजेला  गाडी स्थानकावर आली असता गाडीतील तब्बल ८३९ प्रवाशांना जेवणाचे पाकिटे (खिचडी ) तसेच हजारांपेक्षा जास्त पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे वितरित करण्यात आल्या.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीयांना आपल्या प्रांतात जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येईल, या आशेपोटी गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतीय तग धरून होते. लॉकडाऊन-२ वाढल्यानंतर तर परप्रांतीयांचा संयम सुटला व अनेक परप्रांतीयांचे जथेच्या जथ्थे पायी गावाकडे निघाले होते. नाशिक येथे अडकलेला परप्रांतीयांची शासन दरबारी नोंद झाल्यानंतर गाडी क्रमांक ०२१२१ नाशिक रोड-लखनऊ विशेष श्रमिक गाडी परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली.

या गाडीला १७ डबे जोडण्यात आले. यात १२ स्लीपर, तर ४ सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले. ८३९ प्रवाशांना याद्वारे सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. नाशिक ते थेट लखनऊच्या प्रवाशांनाच गाडीमध्ये प्रवेश देण्यात आला. नाशिक शिवाय गाडीला भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, झांशी, कानपूर याठिकाणी फक्त तांत्रिक थांबा देण्यात आला आहे.गाडीत टीसी यांचेसह आरपीएफ कर्मचारी बंदोबस्त करीता देण्यात आले आहे . जेणें करून प्रवासा दरम्यान  या  स्थानकावरून कोणीही प्रवाशांना प्रवेश तसेच उतरण्याची परवानगी नाही. दरम्यान गाडी स्थानकात येताच सॅनिटाईज करण्यात आली .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची लागण होऊ नये याकरिता गाडीच्या एका ७२ प्रवाशी क्षमता कोचमध्ये, फक्त ५२ प्रवाशांना बसविण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे भान ठेवण्यात आले असून प्रत्येक प्रवाशाला मास्क लावण्यात आले होते.दुपारी १:५५ वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सुटली. दरम्यान संपूर्ण गाडीला भुसावळ रेल्वेस्थानकावर सॅनिटाईज करण्यात आले.यावेळी

स्टेशन निर्देशक जी.आर.अय्यर, मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, मुख्य तिकीट निरीक्षक वि के.सचान, स्टेशन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायर, मुख्य पार्सल परीवेक्षक एच. जी आव्हाड, खानपान निरीक्षक शकील खान, जीआरपी पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते. दरम्यान, १ मे रोजी रात्री गाडी क्रमांक ०२१५३ ही सात डब्यांची नाशिक रोड ते भोपाळ गाडी मध्य प्रदेशातील अडकलेल्या परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली. रात्री १२:३० वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावली.

या सुरुवातीच्या स्थानकावरून गाडी सोडण्यात येत आहे . या गाडीत थेट शेवटच्या स्थानकावरील प्रवाशांना  प्रवेश देण्यात येत आहे. मधल्या स्थानकावर फक्त गाडीला तांत्रिक थांब्यासाठी थांबविण्यात येत आहे.  रस्त्याने कोणतेही प्रवासी चढणाऱ नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.