जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक पंजाबराव उगलेंकडून पाचोऱ्यातील परिस्थितीची पाहणी

0

पाचोरा (प्रतिनिधी) :जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असतांना पाचोरा शहरात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. शहरात सद्यस्थिती मैक २ आणि उपचारासाठी दाखल टिम असे पाच रुग्ण प्रशासनाच्या तपासणी अंती निश्चित झालेले आहेत तसेच या संसर्गाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी पाचोरा येथे भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेत प्रशासनाचा आढावा घेतला. शहरातील स्टेट बँक जवळ आढळलेला कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवारातील दोन जणांना कोरोना चा संसर्ग झाल्याचे तपासणी अंती निष्पन्न झाले आहे. हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून त्या भागातील ४० जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सिंधी कॉलनी मधील एक रुग्ण आढळून आल्यानंतर त्या रुग्णाला त्याच्या परिवारासह २२ जणांना विलगीकरण कक्षात उपचार व निगराणीसाठी ठेवण्यात आले आहे. हा परिसर देखील प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. याशिवाय एका शासकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यामुळे भीम नगर परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून त्यांच्या परिवारातील सदस्यांना व सदर रुग्ण नोकरी करत असलेल्या स्थापनेतील २२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी विलगीकरण करून निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

शहरातील कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर प्रशासन तत्परतेने उपायोजना करत असुन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील आणि पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या निर्देशानुसार नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. अमित साळुंखे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे आणि विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. भूषण मगर तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने कार्यरत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता पाळावी. प्रशासनाच्या निर्णयाची काटेकोर पालन करावे. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.