पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संच बसविण्यात यावे ; आ. चिमणराव पाटील

0

पारोळा (प्रतिनिधी) : दर वर्षी पोखरा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच अनुदान वर मंजूर करण्यात येतात परंतु या वर्षी देशात व राज्यात कोरोना (कोव्हीड १९) च्या प्रादुर्भाव असल्याने शासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणून सदर च्या प्रस्तावना पुर्व संमती मिळण्यास विलंब होत आहे.

तसेच पुर्व संमती शिवाय ठिबक सिंचन संच खरेदी करता येत नाही म्हणून शेतकरी अडचणीत सापडला असून अगदी १० दिवसात पुर्व हंगामी लागवडीला सुरूवात होणार आहे. त्या साठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. यावास्तव लाभार्थी शेतकऱ्यांना पोखरा योजने अंतर्गत अनुदान वर ठिबक सिंचन संच उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ पुर्व संमती पत्र देण्यात यावीत त्याबाबत सविस्तर कार्यवाही करावी त्याबाबत सबंधिताना तातडीने कार्यवाही चे आदेश निर्गमित व्हावेत असे पत्र आज पारोळा एरंडोल विधानसभा सभा क्षेत्रातील आमदार चिमणराव पाटील यांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.