वरणगावातील वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करा ; राष्ट्रवादीतर्फे मागणी

0

वरणगाव (प्रतिनीधी) : लॉक डाऊनच्या काळात गेल्या आठ ते दहा दिवसापासून वरणगाव शहरासह परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री- अपरात्री खंडित होणारा वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, याबाबतचे निवेदन 2 मे रोजी येथील महावितरणचे सहायक अभियंता अखिलेश कुशवाह यांना रा.काँ. तर्फे देण्यात आले. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने नागरिकांना वीज खंडीत झाल्यावर घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नसतो. नागरिक घराबाहेर निघाल्यावर पोलीस दंडुके मारतात. तसेच मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. अशा वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमुद केले आहे.

निवेदनावर राष्ट्रवादीचे न.पा.गटनेते नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, नगरसेवक विष्णू नेमीचंद खोले, गणेश सुपडु चौधरी, रवींद्र शांताराम सोनवणे, साजीद कुरेशी , समाधान चौधरी अल्पसंख्यांक जिल्हा संघटक पप्पू जकातदार, शेख फराज, शेख रीजवान, इद्रिस खान, माजी ग्रा. प. सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश पंडित चौधरी, ओबीसी तालुकाध्यक्ष गजानन वंजारी, शेख एहसान, पवन मराठे यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.