नाशिक रोडवरून नागरिकांना घेऊन श्रमिक ट्रेन यूपीला रवाना

0

नाशिक : लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार व नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. विशेष 16 डब्ब्यांच्या गाडीने हे नागरिक फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आपल्या राज्यात रवाना करण्यात आले. दरम्यान, यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला रवाना केलं.

शुक्रवारी (1 मे) रात्री शेल्टर कॅम्पमध्ये असलेल्या तब्बल 345 लोकांना 6 डब्ब्यांच्या विशेष ट्रेनने मध्यप्रदेशला रवाना करण्यात आलं. यानंतर आज (2 मे) उत्तर प्रदेशच्या 845 नागरिकांना विशेष रेल्वेने लखनौला पाठवण्यात आलं. अनेक मजूर आपल्या मुलाबाळांसह सर्व संसार पाठीवर घेऊन पायीच मुंबईहून नाशिकमार्गे आपआपल्या राज्यात निघाले होते. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून शेल्टर कॅम्पमध्ये ठेवलं होतं. या शेल्टर कॅम्पमध्ये या मजुरांची रितसर आरोग्य तपासणी, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था हे सगळं करण्यात आलं होतं. अखेर जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकारने मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली.

 

MAHARASHTRA DGIPR

@MahaDGIPR

#Lockdown काळात #नाशिक शहर व जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार,नागरिक आज नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून #श्रमिकट्रेन ने लखनौकडे रवाना. पालकमंत्री @ChhaganCBhujbal यांनी ट्रेनमधील नागरिकांशी साधला संवाद. जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित. https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1256474520359067649 

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Chhagan Bhujbal

@ChhaganCBhujbal

लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार व नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. या ट्रेन मधील नागरिकांशी संवाद साधला तसेच ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले.

Embedded video

Leave A Reply

Your email address will not be published.