धक्कादायक : RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण

0

बंगळुरू : जगात थैमान माजवणारा कोराना व्हायरस आता क्रिकेटपर्यंतही पोहोचला आहे. आरसीबीच्या एका खेळाडूला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं रिचर्डसनला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणचे क्रिकेट सामने हे रद्द करण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर लोकप्रिय असलेल्या आयपीएलवर देखील कोरोनाचं सावट होतं.  कोरोनाने क्रिकेटर्सना देखील आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आहे.

दरम्यान, करोनाची लागण झाल्यामुळे केन आगामी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याशिवाय आयपीएललाही तो मुकण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. केन रिचर्डसनला आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळतोय. चांगला गोलंदाज संघापासून दूर गेल्यास विराट कोहलीला चांगलाच फटका बसणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.