करोनाचा भारतात पहिला बळी !

0

बेंगलुरु: जगात थैमान माजवणाऱ्या करोना विषाणूने देशात पहिला बळी गेला असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये वयोवृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी याविषयी माहिती दिली. या व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांनी ट्‌वीट करुन या व्यक्तीचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती दिली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच या सर्व संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.