‘सूर्यवंशी’चा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर लाँच !

0

मुंबई :  रोहित शेट्टी दिग्दर्शित अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर लाँच झाला आहे. जबरदस्त डायलॉग, एकापेक्षा एक अॅक्शन सिक्वेन्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर   ‘एक से भले तीन’ म्हणावं असे अक्षयकुमारच्या जोडीला आलेले ‘सिम्बा’ रणवीर सिंह आणि ‘सिंघम’ अजय देवगन.

मंगळवारी संध्याकाळी 24 मार्चच्या मुहूर्तावर ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बुधवारी म्हणजेच 25 मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. मराठी नूतन वर्षाच्या आदल्या दिवशी सिनेमा रिलीज करुन प्रेक्षकांसाठी ‘लाँग वीकेंड’ तयार करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी शुक्रवार 27 मार्चला सिनेमा रिलीज करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु ठाकरे सरकारच्या नव्या योजनेनंतर ही तारीख बदलण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.