‘तान्हाजी’ चित्रपट 200 कोटींच्या क्‍लबमध्ये

0

तान्हाजी : द अनसंग वॉरिअरची घोडदौड सुरूच असून सिनेमाने बॉक्‍स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात तान्हाजीच्या कमाईचे आकडे जबरदस्त वाढले आहेत. आतापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने १९२ कोटींचा धंदा केला होता, तर आज हा सिनेमा 200 कोटींच्या क्‍लबमध्ये सामील झाला आहे. , असे रिपोर्ट आहेत.

गेल्या आठवड्यात 77 कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे. दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा 8 वा सिनेमा ठरला आहे. या पूर्वी अजय देवगणच्या सिनेमाला एवढे यश मिळाले नव्हते. गोलमाल अगेनने दुसऱ्या आठवड्यात 46 कोटी कमावले होते. पण तान्हाजी त्याच्याही पुढे आहे.


एवढेच नव्हे, तर एकूण कमाईच्या बाबतही तान्हाजी पुढेच असेल असा अंदाज आहे. घोडदौड अशीच सुरू राहिली तर तान्हाजीचा सामना स्ट्रीट डान्सरबरोबर होईल. 2018 आणि 2019 च्या रिपोर्टचा हिशोब बघितला तर कबीर खान आणि संजू हे त्या वर्षातले हिट सिनेमे होते. हे सिनेमे वगळता तान्हाजीने इतर सर्व सिनेमांना केंव्हाच मागे टाकले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.