निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा

0

नवी दिल्ली : देशभर खळबळ माजवणाऱ्या निर्भया बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील दोषींनी अतिरिक्त कागदपत्रे मागण्यासाठी केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांना कोणतीही कागदपत्रे द्यायची राहिलेली नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याबाबत कोणत्याही सुचना देण्याची गरज नाही असे सांगून न्या. ए. के. जैन यांनी ही याचिका फेटळून लावली. विनय शर्मा, अक्षय कुमार आणि पवन गुप्ता यांच्या वतीने न्यायलयात ही याचिका दाखल करण्यात आली होती.

निर्भयाच्या 2012मधील सामुहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींच्या वकीलांनी दिल्ली न्यायलयात शुक्रवारी धाव घेतली तिहार प्रशासन काही कागदपत्रे देण्यास विलंब करत असल्याचा आरोप केला. विनयने लिहलेली दरींदा ही 160 पानी डायरी हे प्रशासन देत नसल्याचा आरोप शनिवारी केला. या डायरीची मागणी आपण 22 जानेवारीला केली होती, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.

ही डायरीअद्याप बराक क्र. चारमध्ये असून ती दयेचा अर्ज करण्यासाठी आवश्‍यक आहे, असे त्याच्या वकीलांनी सांगितले. त्याचे रेकॉर्ड बराक क्र. दोन आणि तीन मधील आहेत. सध्या विनयला बराक क्र. चारमध्ये हलवण्यात आले आहे. त्याला सुरवातील कारागृहाच्या रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याला डीडीयु आणि एलएनपीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्ही त्याच्या कारागृहातील उपचाराचे पुरावे देऊ शकतो. त्याचा हात मोडला होता. त्याच्यावर विष प्रयोग झाला होता. त्याची कागदपत्रे आम्हाला देण्यात आली नाहीत.

विनयची अवस्था सध्या चांगली नाही. त्याने खाणे थांबवले आहे. या सर्व गोष्टी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज देताना आवश्‍यक आहेत, असे त्याच्या वकीलांनी सांगितले. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलेला दयेचा आर्जासोबत त्याची डायरी द्यावी म्हणून शुक्रवारी दिल्ली न्यायलयात धाव घेतली. मुकेश सिंह या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या आठवड्यात फेटाळला होता. हा आतापर्यंतचा या संदर्भातील सर्वात जलद घेतलेला निर्णय होता. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर विनय शर्मा याने फाशी टाळण्यासाठी अटापिटा सुरू केला आहे.

त्याचे वकील ए. पी. सिंग म्हणाले, त्याचा दयेचा अर्ज तयार आहे. मात्र 22 जानेवारीला त्याच्याशी बोलल्याप्रमाणे त्याची 170 पानांची डायरी राष्ट्रपतींकडे देण्याची त्याची इच्छा आहे. त्या बाबत आपण कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला आहे. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.