भीमा कोरेगाव संघर्षाचे हे प्रतिक ; राहुल गांधी

0

नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी राज्यामध्ये जोर धरत असतानाच केंद्र सरकारने अचानक तडकाफडकी निर्णय घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग केले. हे करण्याआधी महाराष्ट्र सरकारला विश्‍वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केंद्राच्या निर्णयावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, की मॉश (मोदी-शहा) यांना विरोध करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरविले जाते. कोरेगाव-भीमा हे संघर्षाचे प्रतीक असून, सरकारच्या तालावर नाचणारी एनआयए ते मिटवू शकत नाही, अशी राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरविले जाते, अशीही जोरदार टीका राहुल गांधी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.