मृत्यूचा महामार्ग

0

सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी एरंडोलपासून पाच कि. मि अंतरावर कालीपिली आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार अन दहा जण जखमी झाली. मन सुन्न करणारी घटना उत्तर कार्याला  गेलेले वंजारी कुटूंब एरंडोलला परतलेच नाही. पती पत्नी आणि मुलाला  जागीच मृत्यूने कवटाळले एरंडोलमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

महामार्गावरील वाहतूक सुरक्षित राहीलेली नाही. फागणे ते तरसोद या महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरु झाले अन ते अर्धवट अवस्थेतच रखडले चौपदरीकरणासाठी रस्ता खोदला गेला.त्यानंतर तो तसाच अवस्थेत पडून आहे. वाहनधारकाना वाहने चालविणेसाठी कसरत करावी लागते परिणामी दररोज अपघाताच्या घटना एरंडोलजवळचा अपघात हा त्याचाच एक भाग म्हणता येईल जळगाव औरंगाबाद चौपदरीकरणाची अवस्था तर त्यावूणंही वाईट आहे. जळगाव ते औरंगाबाद अंतर साडे तीन तासाचे परंतु त्यासाठी लागतात पाच तास अनेकजण जळगावहून औरंगाबादला जाण्यासाठी चाळीसगावमार्गे जाणे पसंद करतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी असताना त्यांना त्याचे सोयर ना सूतक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. किड्यामुंग्यासारखे लोक त्यात चिरडले जाताहेत ज्याच जळत त्यालाच कळत अस म्हणतात अपघातात कुणाचा मुलगा मृत्यू मुखी पडतो कुणाचे वडील कुणाची आई तर कुणाची बहीण मृत होतात.

अपघातात मृत्यू पावलेल्या मृताच्या कुटूंबियावर कोसळलेले संकट भरून न निघणारे असते. एरंडोलमधील वंजारी कुटूंबातील आई वडील आणि मुलगा अपघातात ठार झाल्याच्या घटनेने मन सुन्न वर होतेय पण कुणावरही असा प्रसंग येऊ नये हीच अपेक्षा प्रत्येकजण करेल. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाझर फुटत नाही. हे दुर्दैव  म्हणावे लागेल. जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्नही सर्व मंजुरी असतानाही दोन  वर्ष प्रलंबित राहिला.अपघाताच्या मालिकेत अनेक जळगावकराचा त्यात बळी गेला त्यासाठी मोठे आंदोलन झाले. शासनाने लेखी आश्वासन देऊन सुद्धा निहीत वेळेवर चौपदरीकरणाचे काम सुरु झाले नाही. गेंड्याची कातडी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याची मात्र असंवेदनशीलता बदलत नाही हे विशेष अशा अधिकाऱ्यावर आता मनुष्यवधाचा गुन्हे दाखल तरच त्याच्या प्रवृत्तीत बदल होईल अन्यथा होणार नाही. सोमवारी एरंडोलजवळ झालेल्या अपघाताला जसे राष्ट्रीय महामार्ग जबाबदार आहे तेवढेच अवैध वाहतुकीला अभय देणारे संबधीत पोलीस आणि आरटीओ खाते हेही जबाबदार आहेत. खाजगी वाहतुकीला परवानगी देताना त्याचे जे काही कारण निकष आहेत. ते पाळले जात नाहीत. ते निकष न पाळण्यामागचे कारण काय?या प्रश्नाचे उत्तर मिळते पोलीस व आरटीओ चे यामागचे अर्थपूर्व दुर्लक्ष हे होय. म्हणजे खराब महामार्ग म्हणून अपघाताच्या घटना होत असताना अश्या खराब रस्त्यावर अव्वाच्या सव्वा पॅसेंजर वाहनात बसले गेले तर अपघाताला आणखी निमंत्रण मिळणार यात शंका नाही.

एरंडोल जवळ झालेल्या कालीपिलीच्या अपघातात ऐकून नऊ ठार आणि अकरा जखमी म्हणजे वीस लोकांना कोंबड्यासारखे कोंबले होते काय? या अवैध वाहतुकीचीही चौकशी झाली पाहिजे चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तरच अवैध वाहतुकीला आळा बसेल अन्यथा येरे माझ्या मागल्या हे सुरूच राहील पोलिसांनी सदर अपघातातील ट्रक चालकाला अटक केली. त्याला अटक होणे क्रमप्राप्त आहे. तथापि त्याच्या ट्रकने स्टिअरिंग रॉड तुटल्याने सांगितले जाते. त्यासंदर्भातहि चौकशी व्हायला हवी. एरंडोल जवळील भीषण अपघातानंतर आरोग्य विभागाकडून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेवर पोहचली. जखमीना या रुग्णवाहिकेद्वारे जळगावला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात पोहचल्यावर जखमींना रुग्णवाहिकेतून तर रुग्णवाहीकेचे दारच उघडत नव्हते. शेवटी कटरने दार तोडून आतील जखमींना बाहेर काढले. हे कसले दुदैव म्हणावे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तशातला हा  प्रकार म्हणता येईल १०८ रुग्णवाहिकेची सेवा अत्यन्त चांगली आहे. परंतु त्या वाहनाचा वापर लोकांकडून योग्यरीत्या व्हायला हवा ते होत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. एखादा गंभीर पेशंट रुग्णवाहिकेत असेल आणि त्याला वेळीच उपचार  न मिळाल्याने तो दगावला तर त्याला जबाबदार कोण?एरंडोल जवळील अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित होतात. महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची नाही काय?अवैध वाहतुकीला पोलीस आणि आरटीओ जबाबदार नाही काय ? आरोग्य विभाग प्रशासन सुधारण्याची गरज नाही काय ? हे तिन्ही विभाग कार्यक्षमपणे कार्यरत राहिले तर अपघाताची संख्या आपोआप घटण्यास मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.