मुंदखेडा येथे १७ वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

0

जामनेर (प्रतिनिधी): – तालुक्यातील मुंदखेडा येथील रहिवाशी श्याम रविंद्र राठोड वय १७ या शालेय विद्यार्थ्यांने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मयत हा घटनेच्या आधी सायंकाळी ५ वाजेपासून घरातून बेपत्ता होता.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के.पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर १०६/२०१९ नुसार नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे करीत आहेत.मयत हा गारखेडा येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ असा परिवार आहे.श्यामच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.