जिल्ह्यावासीयांनी अनुभवले खंडग्रास सूर्यग्रहण

0

जळगाव/भुसावळ : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहणाचा २७ गुरुवार रोजी जिल्हावासियांनी आनंद लुटला. तब्बल ५४ वर्षानंतर येणाऱ्या या ग्रहणास बघण्याचा आनंद खगोलप्रेमी अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी काळा चष्मा (गॉगल ) व दुर्बीण द्वारे घेतला. तर अनेक ठिकाणी सूर्यग्रहणास ढगाळ वातावरणामुळे अनेकदा अडसर येत होता यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.दक्षिण हिंदुस्थानातून हे ग्रहण कंकणाकृती तर महाराष्ट्र व उत्तर हिंदुस्थानात हे ग्रहण खंडग्रासअवस्थेत दिसणार होते मात्र अनेक ठिकाणी ढगां मुळे (आभाळ ) दिसले नाही असे खगोल अभ्यासक विद्यार्थी यांनी सांगितले.

वर्षअखेरीस होणाऱ्या या सूर्यग्रहणास प्रारंभ जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजता महाराष्ट्रात पंचांग वेळेनुसार सकाळी ८.०४ मिनिटानी ग्रहण स्पर्श सुरु झाला ग्रहण मध्य ९.३२ मिनिटांनी व मोक्ष १०.५६ मिनिटांनी झाला. खग्रास ग्रहण पाहण्याची संधी अनेकांनी अनुभवली.

श्रद्धा व अंधश्रद्धा

सूर्यग्रहणाचे धार्मिक दृष्ट्याही अतिशय महत्त्व मानणाऱ्या धार्मिक व आध्यात्मिक काही नागरिकांनी ग्रहण सुरू होण्या अगोदर देवपूजा करून देव पाण्यात ठेवले तर पिण्याच्या तसेच खाण्यापिण्याच्या पदार्थांवर तुळशीपत्र ठेवतात, ग्रहणकाळात जेवण नये. जप, नामस्मरण केले. ग्रहणमोक्ष झाल्यानंतर धार्मिकता जपणाऱ्या नागरिकांनी ग्रहण काळात आपल्या साधना जपुन ग्रहण सुटल्या नंतर स्नानादि पूजा पठण केले. अघोरी विद्या, तंत्रविद्येच्या क्षेत्रातही ग्रहणास अतिशय महत्त्व असल्याचे बोलले जाते.

भौगोलिक प्रक्रिया

सूर्यग्रहण हे भौगोलिक प्रक्रिया असल्याने याकाळात शुभ अशुभ असे काहीही नसते असे ठाम मत भुसावळ येथील खगोलशास्त्र अभ्यासक प्रा.आर.डी.भोळे, प्रा. डॉ.दयाघन एस.राणे, दादासाहेब डी.एन.भोळे कॉलेज भुसावळ, प्रा.प्रशांत पाटिल नाहाटा महाविद्यालय भुसावळ, प्रा.पी.पी.लढे, श्रीमती जी.जी.खडसे मुक्ताईनगर कॉलेज यांनी व्यक्त केले. त्यांनी नाष्ट्यासह ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.