कझाकिस्तानात १०० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले!

0

नवी दिल्ली : कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.  दरम्यान, या विमान अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कझाकिस्तानातील अलमाटी  विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळले. यावेळी विमानात 100 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.टेक ऑफ दरम्यान या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जाताना हे विमान अपघातग्रस्त झालं. रॉयटर्सनुसार या विमानात एकूण ९५ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी हा अपघात झाला.

टेक ऑफ दरम्यान विमानाचा ताबा सुटला आणि विमान नजिकच्या दोन मजली इमारतीवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आपात्कालिन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.