आरोग्य विभागाचा गलथान कारभार

0

जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथील 12 वर्षाचा बालकाचा उपचाराअभावी काल मृत्यू झाला. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकाला राहणार्‍यांना योग्य आरोग्य सेवा मिळावी, आरोग्य सेवेअभावी कुणीही दगावला कामा नये. यासाठी शासनस्तरावर मोठे प्रयत्न केले जातात. त्यासाठी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेले आरोग्य केंद्रे असतांना या केंद्राचा हलगर्जीपणा आणि गलथान कारभारामुळे रुग्ण दगाविला तर हे दुदेवच म्हणावे लागेल. कुर्‍हा येथील 7 वीच्या वर्गात शिकणारा मोसीन शा सांडू या 12 वर्षाच्या बालकाचा केवळ उपचाराअभावी मृत्यू झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आजारी असलेल्या या बालकाची प्रकृती गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अचानक बिघडली. कुर्‍हा काकोडा आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले तर तेथे ऑक्सीजन नसल्याने त्याला इतरत्र हलविल्याने असे डॉक्टरांनी सांगितले. त्या रुग्ण बालकाच्या वडीलांनी-नातेवाईकांनी रुग्णवाहिका मिळावी. म्हणून 108 क्रमांकांच्या रुग्णवाहिकेला फोन केला तेव्हा नाही म्हणून रुग्णवाहिका दोन तासानंतर मिळेल असे सांगण्यात आले. बालकाची प्रकृती गंभीर होत असल्याने खाजगी वाहनाने सदर बालकाचा उपचारासाठी मलकापूरला नेण्याचा वडीलांनी निर्णय घेतला. परंतु रुग्णाबरोबर 108 रुग्णवाहिणीचे घरी गेले. त्यांना विनंती केली. त्यामुळे एकट्या बालकाला खाजगी वाहनाने घेवून मलकापूरच्या नेण्यात आले. ऑक्सीजन अभावी प्रकृती आणखीनच गंभीर झाले. अखेर त्या बालकाचा मृत्यू झाला. आपल्या पोटच्या गोळ्याला कशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर माता पित्यांच्या भावनांचा त्यांच्यावर कोसळलेले त्या दुखाचा विचारच करवित नाही. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी त्या बालकाचा मृतदेह कुर्‍हा काकोडा रुग्णालयात ठेवला. त्यावर अंत्यसंस्कारच करणार नाही. असा निषेध त्यांनी नोंदविला. परंतु गावातील काही संभ्य नागरिकांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून अखेर त्या बालकाचा मृतदेह घेवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपचाराअभावी रुग्ण बालकाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? याचे उत्तर आरोग्य विभागाचा गलथानपणा जबाबदार आहे. हेच होय. रुग्णाला उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध व्हावि  म्हणून 108क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेली आहे एका प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता 108 ची एक रुग्णवाहिणि असताना तत्पर सेवा मिळायला हवी परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रच रामभरोसे चालतात अनेकवेळा या आरोग्य केंद्रात डॉक्टरच हजर राहत नाहीत त्यामुळे उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला उपचाराअभावी ताटकळत बसावे लागत आरोग्य केंद्राचे प्रशासन सुधारण्याची गरज आहे. रुग्णाच्या सेवेसाठी 108 रुग्णवाहिका असताना ती रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसेल तर  ती रुग्णवाहिका ठेवण्याचे कारण काय ?पहिल्यांदा 108 रुग्णवाहिकेसाठी फोन केला तर तो फोन उचलला जात नाही फोन उचलला तर तातडीने ती उपल्बध होत नाही त्यासाठी अनेक प्रचारची कारणे सांगितले जातात रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर उपलब्ध नाही रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी रुग्णवाहिकेला डॉक्टर उपलब्ध नसतो अशी कारणे दिली जातात. कुर्‍हाचा बालक मृत्यप्रकरणात रुग्णवाहिकेचा दोन तासानंतर मिळेल असे उत्तर रुग्ण बालकाच्या वडिलांना देण्यात आले. त्यामुळे त्यांना खाजगी वाहन करावे लागले त्यासाठी रुग्णासोबत ड्रायव्हर हवा परंतु त्यांना मिळाला नाही ड्युटी संपल्याचे  कारण सांगून संबंधित डॉक्टरने आपली असमर्थता दाखविली त्यामुळे डॉक्टर शिवाय बालक रुग्णाला मलकापूरला नेण्यात आले त्याला वेळेवर उपचार मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या तसेच त्याच्या वतीने ग्रामीण भागात चालविण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारास कमालीची सुधारणा होणे आवश्यक आहे. कुर्‍हा काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आलेल्या 36खेड्यातील जनतेला सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा योग्य व तात्काळ कशी मिळेल त्याचे नियोजन झाले पाहिजे तश्या प्रकारचे नियोजन करण्याची जबाबदारी आरोग्य खात्याचीच आहे पण ती का केली जात नाही याबाबतचे कारण स्पष्ट झाले पाहिजे ग्रामीण आरोग्य केंद्रात सेवेला असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे परंतु अनेक डॉक्टर आपल्या सेवेत कसूर करतात त्याचा कल खाजगी प्रॅक्टिस करण्याकडे असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या गरीब रुग्णाकडे दुर्लक्ष होते आहे तसाच प्रकार कुर्‍हा काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून झालेला आहे. या केंद्रात आक्सिजन का उपलब्ध नव्हते ?ऑक्सिजन सपल्यानंतर ते आणण्याची जबाबदारी कोणाची ?या गलथान कारभाराला कंटाळून त्या परिसरातील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले तर त्याचे काय चुकले ?

Leave A Reply

Your email address will not be published.