भुसावळातील एन.के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना बेकरीचे प्रशिक्षण

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमधील एक हजार विद्यार्थी-विद्यार्थीनींना केकसह बेकरीचे अन्य पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
हा कार्यक्रम मॉन्जिनीज केक फॅक्टरी, औरंगाबाद यांच्या वतीने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.व्ही.पाटील, मॉन्जिनीजचे संचालक डॉ.बालाजी रंगनाथ गलधर, गुजराथी स्वीटस्चे संचालक कपिल मेहता, सचिव प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका कोमल कुळकर्णी आदींची उपस्थिती होती. डॉ.बालाजी गलधर यांनी केकचे उत्पादन, वितरण याची माहिती प्रोजेक्टद्वारे विद्यार्थ्यांना दिली. प्रशिक्षणात शाळेच्या प्रतिकृतीचा केक बनवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना डेरीमिल्क व पेस्ट्रीचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यानी आनंद घेतला .

Leave A Reply

Your email address will not be published.