भीषण वास्तव.. शिंदे सरकारच्या 23 दिवसांत 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण थाबंत नाहीय, त्यातच एक खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपासून म्हणजेच गेल्या 23 दिवसांत राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.

विशेष म्हणजे यात सर्वाधिक संख्या मराठवाड्यातील असून, गेल्या 23 दिवसांत मराठवाड्यातील 46 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैरोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा पहिला संकल्प केला होता. मात्र या आकडेवारीवरून हा संकल्प फोल ठरतांना दिसत आहे.

शेतकरी आत्महत्या आकडेवारी जिल्हानिहाय

औरंगाबाद- 15, बीड- 13, यवतमाळ- 12, अहमदनगर- 07, परभणी- 06, जळगाव- 06, जालना – 05, बुलडाणा- 05, उस्मानाबाद- 05, अमरावती- 04, वाशिम – 04, अकोला- 03, नांदेड – 02, भंडारा-चंद्रपूर – 02,  एकूण – 89

 

Leave A Reply

Your email address will not be published.