दिलासादायक : जिल्ह्यात आज ११२५ रुग्ण कोरोनामुक्त, तर १००६ नवे रुग्ण

0

जळगाव  । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थैमान घातले आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या हजार ते अकराशे च्या आसपास आढळून येत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. आज १००६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ११२५ रुग्ण बरे झाले आहे. तर आज दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ वर गेली आहे. आज ११२५ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७ हजार ०२६ वर गेला आहे. दरम्यान आज दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा हा २१४२ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ७६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- १७३ जळगाव ग्रामीण- ४७, भुसावळ-१३०, अमळनेर-६०, चोपडा- ९७, पाचोरा- ४७, भडगाव-११, धरणगाव- ३३, यावल- २५, एरंडोल- ७३, जामनेर- ३८, रावेर- ७०, पारोळा- २०, चाळीसगाव- ५०, मुक्ताईनगर- ९०, बोदवड-३५ आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १००६ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.