सोने-चांदीच्या भावात घसरण ; जाणून आजचे नवे दर

0

मुंबई :  मागील काही दिवसात सोने चांदीचे भाव वाढले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोने ४७ हजाराच्या पार गेले आहे तर चांदी ६८ हजाराच्या पार गेले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.   मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याची किंमत 0.12% प्रति 10 ग्रॅमने घसरली होती. तर, मे वायद्याच्या चांदीच्या किंमतीत 0.26% प्रतिकिलो घट झाली. गुरुवारी (15 एप्रिल) यूएस ट्रेझरी यील्ड एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोन्याच्या किंमती या आठवड्यात वाढल्याचे दिसून आले होते.

सोन्याची आजची किंमत

शुक्रवारी, एमसीएक्सवर  जून वायदा सोन्याच्या किंमती 55 रुपयांनी घसरून 47,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आल्या. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 1.2 % वाढीसह बंद झाला होता.

चांदीची आजची किंमत

एसीएक्सवरील मे वायदा चांदीचा भाव 179 रुपयांनी घसरून 68,375 रुपये प्रतिकिलो राहिला. मागील सत्रात चांदीही 1.2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली होती.

स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीचा भाव

लग्नाचा हंगाम 22 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यापूर्वी सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोने गुरुवारी महागले होते. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 159 रुपयांची वाढ झाली आणि ती प्रति 10 ग्रॅम 46301 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.चांदीचा दर देखील 206 रुपयांनी वाढला आहे आणि दिल्ली सराफा बाजारात त्याचे दर 67168 रुपये प्रति किलो होते

Leave A Reply

Your email address will not be published.