३६ किलो सोनं सापडलं

0

लोकशाही न्यूज नेटवर्क    
मुंबई- मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. मंगळवारी डीआरआयने मुंबई विमानताळावरुन तब्बल ३६ किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत तब्बल २१ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तर या तस्करांकडून २० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. तसेच, सोनं वितळवणाऱ्या एका दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे.
हे तस्करी करुन आणलेलं सोनं कोडवर्डच्या माध्यमातून स्थानिक ऑपरेटर्सला दिलं जाणार असल्याचंही तपासात समोर आलं आहे. या तस्करांनी सोनं लपवण्यासाठी ट्रॅव्हल बॅग, कापड आणि इतर माध्यमांचा वापर केल्याचंही उघड झालं आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.