तलाठ्यांची चार हजार पदे भरणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क    
पुणे- गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती आता लवकरच होणार असून सुमारे चार हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार शासनस्तरावर या भरतीबाबतचे आदेश निघाले असून महसूल विभागाच्या कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील सर्व जिल्ह्यात रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. दरम्यान या भरतीसाठी राज्यस्तरावर राज्य समन्वयक म्हणून भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर विभागीय पातळीवर उपायुक्त महसूल आणि जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या भरतीबाबत शासनाने हे आदेश दिले आहेत.
राज्याच्या विविध शासकीय विभागात गेल्या अनेक वर्षापासून गट ‘क ’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी शासनाचे निर्बध होते. त्यामध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळेच विविध विभागातील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यातील विविध गावात नक्की किती पदे रिक्त आहेत, याचा आढावा घेण्याच्या कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार तलाठ्यांची पदे वाढण्याची शक्यता आहे. तूर्त चार हजार पदे भण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
ही पदभरती ऑनलाईन पध्दतीने परीक्षा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कालबद्ध कार्यक्रम आखून परीक्षेसाठी निवड केलेल्या कंपनीसोबत पदभरतीबाबत सामजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक , परीक्षेचे नियोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या व न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे, त्यांचप्रमाणे उमेदवारांकडून पदभरती संबधित आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक पदभरती संबधित इतर अनुषंगिक कामे विहित पार पाडणे तसेच संपूर्ण भरती प्रक्रीया वेळेत तसेच सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी भूमिअभिलेख विभाग पुणेचे अतिरिक्त आयुक्त यांना राज्यस्तरीय समन्यवक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या भरतीसाठी आवश्यक असलेली जाहिरात लवकरच प्रसिध्द होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.