दहशतवाद्यांनी घेतला व्हॉट्स अॅप, फेसबूक, यू ट्यूबचा आधार

0

वृत्त संस्था –

सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास पथकानं काश्मिरी फुटीरतावाद्यांसह 12 जणांविरोधात दहशतवादासाठी निधी पुरवण्यासंदर्भात किंवा टेरर फंडिंगसदर्भात गुन्हा दाखल केला होता. काश्मिरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये विविध स्तरांवर व्हॉट्स अॅप, यू ट्यूब, फेसबूक व वेबसाईट्स आदी अत्याधुनिक सोशल मीडिया फुटीरतावाद्यांच्या कामाला येत असल्याचं निरीक्षण एनआयएनं नोंदवलं आहे. लष्कर ए तय्यबा, हिजबूलसारख्या संघटनांकडून टेरर फंड गोळा करण्यात येत असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. एकूण 1200 पानी आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली असून या आरोपपत्रातील महत्त्वाचे पुरावे पुढीलप्रमाणे आहेत…

– हुरीयत कॉन्फरन्सच्या वेबसाइटवरून जम्मू व काश्मिरची जनता भारतीय राजवटीविरोधात आवाज उठवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय लष्कर काश्मिरमध्ये 27 ऑक्टोबर 1947 रोजी आलं आणि तेव्हापासून लढा सुरू आहे असंही या साईटवर म्हटलंय. एनआयएनं नमूद केलंय की अशा प्रकारचा मजकूर फुटीरतेचा अजेंडा दाखवतो. भारतापासून काश्मिर वेगळं करण्याचा प्रयत्न यात दिसतो.

– अयाझ अकबर खांनदेय यानं व्हॉट्स अॅपवर केलेल्या आवाहनाचा दाखला राष्ट्रीय तपास पथकानं दिला आहे. सय्यद गिलानी, मिरवैझ फारूक व मोहम्मद मलिक यांनी संयुक्तपणे स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे आणि एकी राखण्यासही सांगितलं आहे असा हा संदेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.