सोमवारी 554 गाळेधारकांनी जमा केले नऊ कोटी

0

जळगांव प्रतिनिधी –
गाळेधारकांनी तीन दिवसापासून थकीत रकमेचा भरणा करण्यास सूरवात केली आहे आतापर्यंत जवळपास महापलिकेकडे 22 कोटीच्या आसपास भरणा झालेला आहे.
सोमवारी फुले मार्केट मधील गाळेधारकांची थकीत रक्कम भरण्याची मुदत संपली आहे. त्या अनुषंगाने काही गाळेधारकांनी सहा कोटी रुपयांचे चेक महापालिका प्रशासनाकडे तक्रार हरकत ठेवून सूपुर्द केले. आतापर्यंत गाळेधारकांनी 22 कोटी रुपये चेकद्वारे मनपाकडे जमा केले आहे.
भाडेकरार संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाडे व मालमत्ता कराच्या रकमेचा भरणा करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. गाळेधारकांना रविवार भरणा करात यावा यासाठी किरकोळ वसूली विभाग सुरु ठेवला होता. परंतु त्या दिवशी एकही गाळेधारकांनी रक्कम जमा केली नाही. उर्वरीत गाळेधारकांना दिलेली मुदत संपत आलेली आहे. मनपाकडून जप्तीची कारवाई टाळावी यासाठी गाळेधारकांनी काल मनपाने दिलेले पाच पट दंड वगळून इतर थकीत रक्कमेचे धनाकर्ष हरकत कायम ठेवून महापालिका प्रशासनाकडे सूपुर्द केले.
गाळेधारकांनी रेडीरेकनरनुसार तसेच गाळयांचे व्हॅल्यूएशन व घसारा या सगळया बाबींचा वजावट करुन महापालिकेकडे उर्वरीत रकमेचा धनाकर्ष दिला आहे.
सोमवारी गेंदालाल मील, जुने आणि नवीन शाहू महाराज संकुल, महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट, धर्मशाळा मार्केट शिवाजीनगर, निनाबाई संकुल, वालेचा मार्केट, भास्कर मार्केट, जुने बी.जे. मार्केट, व इतर काही गाळेधारकांनी महापालिकेत येवून चेक जमा केले. तसेच काही गाळेधारकांनी रोखीने रक्कम जमा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.