चार तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सात सदस्य अपात्र !

0

जळगाव : दिलेल्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या चार  ग्रामपंचातीच्या  सात सदस्यांवर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी ११फेब्रुवारी मंगळवार रोजी अपात्रतेची कारवाई करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चाळीसगाव, एरंडोल जामनेर या तालुक्यामधील ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त असे कि जळगाव जिल्ह्यामधील शेमळदे ता,मुक्ताईनगर २०१५ यावर्षी निवडणूक झाली होती, संगीता पुंडलिक कोळी या (राखीव महिला वर्ग)मतदारसंघातून  विजयी झाल्या होत्या तसेच जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. याबाबत  त्याच्याविरुद्ध २६ ऑगस्ट२०१९ रोजी  विनोद विठ्ठलराव चोपडे यांनी तक्रार  केली होती, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना  अपात्र घोषित करण्यात आले.

जामनेर तालुक्यातील मोरगाव  ग्रा प. ची निवडणूक  २०१८ साली झाली असता  गिरीजाबाई  मेहराम ठाकूर या (महिला राखीव)मतदार संघातून निवडणूक लढविली होती. मात्र  त्यांनीही जातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. म्हणून त्याच्या विरुद्ध हिरालाल शंकर राठोड यांनी ११जुलै २०१९ रोजी तक्रार केली  असता याप्रकरणी  ११फेब्रुवारी२०२० रोजी  जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले. विखरण ता एरंडोल येथील ग्रामपंचायत २०१८ सार्वत्रिक  निवडणूक झाली असता यामध्ये योगराज बळीराम महाजन, किरण बळीराम महाजन, बापू भीका इंगळे,माधुरी मनोहर ठाकूर, हे सदस्य विजयी झाले होते तसेच या सदस्यांनीदेखील  जात वैधता  प्रमाणपत्र सादर न केल्याने  याच्याविरुद्ध ओंकार कृष्णा पाटीलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती  मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांनादेखील अपात्रता  केले गेले.

खेर्डी चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक अनिल बंकट पवार,आणि मिनाबाई लहू सोनार (अनु जमाती ) या प्रवर्गातून निवडणूक   लढवली होती मात्र त्यांनीसुद्धा वेळेत जात  प्रमाणपत्र सादर न केल्याने  त्याविरुद्ध नंदकिशोर धनराज पाटीलांनी तक्रार केली होती मात्र अनिल पवार यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले म्हणून ते पात्र ठरले आहे,आणि मिनाबाई सोनार हे अपात्र ठरलेले आहेत, यामध्ये विखरन ग्रामपंचायतमधील चार सदस्य अपात्र करण्यात आले आहे.सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय विधी लेखाधिकारी ऍड हरुल देवरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.