भुसावळात अज्ञाताने दुचाकी जाळली

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील पंचशील नगरात घरासमोर  उभी असलेली दुचाकी मोटरसायकल  कोणीतरी अज्ञाताने जाळल्याची घटना येथे सोमवार( ११) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

शहरातील  पंचशील नगर भागातील रहिवाशी रईस गफूर तडवी यांची मोटरसायकल (एम.एच.19 सी.डी.0204) क्रमांकाची फॅशन प्रो.कंपनीची दुचाकी घराजवळ लावली होती. मध्यरात्री ३ वाजेचे  सुमारास कोणीतरी  अज्ञाताने  बिडी,काडी पेटवून  मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादीचे सुमारे तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद रईस गफूर तडवी यांनी दिल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला  पोलीस अज्ञात इसमाच्या विरुद्ध गु.र.न.48 /2020 कलम 435   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शानाखाली पोहेकॉ मिलिंद कंक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.