५ लाखांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला घर घेण्यासाठी ५ लाख रूपये माहेरहून आणावे यासाठी पतीसह सासरच्यांकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी पतीसह सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिता अनिकेत पवार (वय २८  रा. तुलसी विहार पनवेलकर, रॉयल कोर्स, बदलापूर मुंबई ह.मु. म्हसावद तालुका जि. जळगाव) यांचा विवाह अनिकेत नितीन पवार रा. बदलापूर मुंबई यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती अनिकेत पवार यांनी आपल्या रिता पवार यांच्याकडून माहेरहून ५ लाख रुपये आणावे म्हणजेच घर घेता येईल या कारणासाठी शिवीगाळ करणे, मारहाण करणे हा छळ सुरू केला.

यासाठी सासू लताबाई नितीन पवार यांनीदेखील मुलाला साथ देवून विवाहिता रिता पवार यांचा छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी शिरसोली येथे निघून आल्यात. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलीसात शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पती अनिकेत नितीन पवार आणि सासू लताबाई नितीन पवार यांच्याविरोधात शारीरिक छळ व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.