१७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सलग १७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर १८ पैशांनी तर डिझेल ५२ पैशांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपये झाला आहे. तर डिझेल ७७.७६ रुपये झाला आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोल ८६.३६ रुपये तर डिझेल ७७.२४ रुपये होते.

दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपये झाला. त्यात २० पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोल ८१.४५ रुपये झाले आहे. तर चेन्नईत पेट्रोलने ८३.०४ रुपयांचा स्तर गाठला आहे. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.४० रुपये झाला. त्यात ५५ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७४.६३ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७६.७७ रुपयांचा स्तर गाठला आहे. आज चेन्नईत डिझेल ४७ पैशांनी महागले आहे.

करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. य़ा दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.