१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील एका भागात राहणार १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने काल सोमवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शाहूनगर परिसरात १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. शनिवार ७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरासमोर असलेली असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी नातेवाईक व परिसरात शोधाशोध केली परंतू मुलगी आढळून आली नाही. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी शहर पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.