हॉटेलमधेच फाशी घेत वेटरने संपवली जीवनयात्रा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील अजिंठा चौफुली जवळ असलेल्या हॉटेल महाराजा येथील वेटरने गळफास घेत आत्म्हत्या केली आहे. हॉटेलमधेच फाशी घेत आपली जिवनयात्रा संपवणा-या वेटरचे नाव जितू असे सांगितले जात आहे. त्याचे पुर्ण नाव अद्याप समजू शकले नाही.

जितू हा चाळीसगाव येथील रहिवासी असून त्याचा मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने खळबळ पसरली  आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे कामकाज सुरु होते. जितू नाव असलेल्या वेटरने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.