हैद्राबाद : यापूर्वीही ‘त्या’ नराधमांनी ९ महिलांना जाळलं होतं!

0

हैद्राबाद – हैद्राबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केला. मात्र, यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या नराधमांनी दिशाच्या आधी नऊ महिलांवर अत्याचार करून त्यांना जाळून मारलं होतं. खुदद् पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींननी नऊ महिलांवर बलात्कार करून त्यांची जाळून हत्या केली होती. चार आरोपींमधील आरोपी आरिफने ६ तर आरोपी चेन्नाकेशववुलू तीन महिलांवर बलात्कार करून हत्या केली होती. यातील काही घटना तेलंगणा-कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात झाली आहे. आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यांची कबुली देण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तसेच आरोपींकडून माहिती मिळालेल्या माहिती आधारे सायराबाद पोलीस अधिकाऱ्यांनी कर्नाटकमधील त्या नऊ पीडितेंची माहिती शोधण्यास सुरुवात केली आहे. आमची टीम या प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, हैद्राबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्नाकेशवुलू आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही मारले गेले होते. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच एसआयटीमार्फेत देखील याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.